जाधववाडी, (वार्ताहर) – कै. जगन्नाथ तुकाराम राऊत विद्यालय व ज्ञानज्योती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पालकसभा व आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे, या दृष्टिकोनातून हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी विविध प्रकारचे स्टॉल विद्यालयाच्या प्रांगणामध्ये मांडण्यात आले आणि या स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक व्यवसायाच्या माध्यमातून नफा आणि तोटा कसा होतो आणि तो व्यवसाय कसा केला जातो, हे त्यांना स्वतःच्या अनुभवातून त्यांना समजले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष राहुल राऊत, मुख्याध्यापिका वर्षा लोखंडे, प्रभारी मुख्याध्यापक अभिजीत राऊत, कांचन राऊत, सोमनाथ राऊत व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनाजी उमाटे यांनी केले. रूपाली निळकंठ आणि बिभीषण खोसे यांनी उपक्रमाची माहिती दिली. उमेश सांगळे यांनी आभार मानले.