जळोची – बारामती शहरातून चोरीला गेलेला छोटा हत्ती टेम्पो कोणताही तांत्रिक पुरावा नसताना बारामती शहर पोलिसांनी अवघ्या आठ तासात शोधून काढला आहे. याप्रकरणी अनिल भरत बळते ( रा. जोगलादेवी.ता घनसांगवी, जि.जालना )यास अटक केली आहे.
त्याच्याकडून ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला आहे.
कोणीतरी अज्ञात चोरट्याने टाटा कंपनीचा छोटा हत्ती टेम्पो चोरी केल्याची फिर्याद प्रदीप ताकवले (रा.जळोची, ता.बारामती) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली होती. सदर गुन्ह्यात कोणताही तांत्रिक पुरावा नसताना गुप्त माहितीदारा मार्फत माहिती मिळवून अवघ्या 8 तासात शहर पोलिसांनी सापळा रचून सदर आरोपीला ताब्यात घेतले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक फौजदार शिवाजी निकम, पोलीस नाईक रुपेश साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार चव्हाण,अकबर शेख, दशरथ इंगोले यांनी केली.