मंडप नियमांची काटेकोर अंमलबजावणी

सुरेश इथापे : नियम मोडल्यास फौजदारी कारवाईचा बडगा

नगर – गणेशोत्सव अवघ्या बारा दिवसांवर येवून ठेपला आहे. मंडळांची वर्गणी गोळाकरण्याची तसेच मंडप उभारणी साठी लागणाऱ्या परवानगी मिळविण्यासाठी लगबग सुरू आहे. मात्र यंदा उत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या गणपती मंडळांना परवानगी देतांना त्याच्या काटेकोर अंमलबजावणी कडेही काटेकोरपणे लक्ष देण्यात येणार आहे. गेल्यावर्षी ज्या गणेशोत्सव मंडळांनी नियमावली मोडली. त्यामंडळांना यंदा परवानगी नाकारण्यात येणार असून यावर्षी नियमावली मोडणाऱ्यां मंडळांवर थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी दिली.

यंदा गणेशोत्सव ,दहिहंडी, मोहरम हे सण थोड्याफार फरकाने एकाच वेळी आल्याने यासर्व मंडळांना परवानगी देण्यासाठी मनपाने एक खिडकी योजना सुरू केली आहे. त्याद्वारे अग्नीशमनदल ,शहरवाह्तुक पोलीस , नगररचना विभाग, एम.एस ई.बी बोर्ड या राच विभागाचे कर्मचारी या कक्षात असून तेथेते नियमात बसणाऱ्या मंडळांना ना हरकतीचे प्रमाणपत्र देतात त्यमुळे गणेशोत्सव ,दहिहंडी, आणि मोहरमच्या मंडळांची होणारी धावाधाव वाचली आहे.यंदा 40 गणेशोत्सव मंडळांनी आतापर्यंत परवानगी घेतली असून येत्या 26 तारखेच्या सायंकाळ पर्यंत परवानग्या देण्यात येणार असून त्यानंतर येणाऱ्या मंडळांना परवानगी देणार नसल्याचे ही इथापे यांनी सांगितले.

न्यायालयाच्या आदेशानुसार नियमावलीत परवानगी देण्यात आलेल्या मोजमापापेक्षा जास्त आकाराचा मंडप उभारल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून ,सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारतांना स्थानिक रहिवाश्‍यांना उपद्रव निर्माण होवू नये. वाहतुकीस अडथळा होवू नये, मंडप उभारलेल्या रस्त्यावरून अग्नीशमनदल, रुग्णवाहिका,आदींची ये-जा सहजगत्या होण्या एव्हढी जागा सोडावी, सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारतांना रस्त्याच्या किमान 60टक्के व त्यापेक्षा जास्त भाग वाहतुकीस खुला ठेवावा.

उत्सवाच्या काळात कुठल्याही प्रकारची जिवीत वा वित्त हानी झाल्यास मंडक़्ळाच्या पदाधिकाऱ्यांना त्यास जबाबदार धरण्यात येईल.मंडपामध्ये सी.सी.टिव्ही कॅमेरेबसवावेत जेणे करून मंडपाच्या आजूबाजूचे चित्रीकरण त्याद्वारे उपलब्ध करता येवू शकेल,हे कॅमेरे अहोरात्र सुरू ठेवावेत अशा सुचना गणेशोत्सव मंडळांना देण्यात आल्या आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×