Share Market Closing : मंगळवारी (दि. 19 मार्च) शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. BSE चा सेन्सेक्स 736.37 अंकांच्या किंवा 1.01 टक्क्यांच्या घसरणीसह 72,012.05 वर बंद झाला तर NSE चा निफ्टी 238.25 अंकांच्या किंवा 1.08 टक्क्यांच्या घसरणीसह 21,817.45 वर बंद झाला.
वाढ झालेले शेअर्स –
सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी केवळ 7 समभागांमध्ये वाढ झाली असून 23 समभाग घसरणीसह बंद झाले. यामध्ये बजाज फायनान्स 1.38 टक्के, कोटक महिंद्रा बँक 0.57 टक्के, ICICI बँक 0.26 टक्के, भारती एअरटेल 0.23 टक्के, HDFC बॅंक 0.19 टक्क्यांनी वाढले.
घसरणारे शेअर्स –
सेन्सेक्समधील 23 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. त्यामध्ये टीसीएस 4.03 टक्के, नेस्ले इंडिया 3.37 टक्के, इंडसइंड बॅंक 3.15 टक्के, विप्रो 3.05 टक्के, एचसीएल 2.62 टक्यांच्या घसरणीसह बंद झाले.
निफ्टी शेअर्सची स्थिती –
निफ्टीच्या 50 समभागांपैकी केवळ 9 समभाग वाढीसह बंद झाले आणि 41 समभाग कमजोरीसह लाल चिन्हावर बंद झाले. बजाज ऑटो 1.47 टक्के, बजाज फायनान्स 1.25 टक्के. आयशर मोटर्स 0.87 टक्के. कोटक महिंद्रा बँक 0.73 टक्के तर एचडीएफसी बँक 0.27 टक्क्यांनी वाढीसह बंद झाले.
BSE चे बाजार भांडवल –
आज बीएसईचे मार्केट कॅप 373.96 लाख कोटी रुपयांवर घसरले आहे, तर सोमवारी हे बाजार भांडवल 378.79 लाख कोटी रुपये होते.
पेटीएमचे शेअर्स 4 टक्क्यांनी वाढले –
पेटीएमचे शेअर्स आज 4.57% वाढले. काल सोमवारी पेटीएमला 5 टक्के वरचे सर्किट लागले होते. येस सिक्युरिटीजने आज बाजार लिस्टिंगनंतर पहिल्यांदा पेटीएमला 505 रुपयांचे लक्ष्य किंमत देत अपग्रेड केले आणि ‘बाय’ रेटिंग दिली आहे.
काल बाजारात तेजी होती –
यापूर्वी काल म्हणजेच 18 मार्च रोजी शेअर बाजारात तेजी दिसून आली होती. सेन्सेक्स 104 अंकांच्या वाढीसह 72,748 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टीमध्ये 32 अंकांची वाढ होऊन तो 22,055 च्या पातळीवर बंद झाला होता. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 16 समभागांमध्ये घसरण आणि 14 समभागांमध्ये वाढ झाली होती.
सेन्सेक्समधील 30 समभागांची स्थिती –