राज्यस्तरीय आरटीई पहिली लॉटरी जाहीर

पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार आरटीई’च्या २५ टक्के प्रवेशासाठी राज्यातून २ लाख ४६ हजार ३४ अर्जांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. या अर्जांसाठी आज सोमवार (दि.८) एप्रिल रोजी उर्दू मूलांची शाळा आझम कॅम्पस् मैदान येथे पहिली लॉटरी प्राथमिकचे सहसंचालक दिनकर टेमकर यांच्यासमक्ष लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठीद्वारे प्रातिनिधिक स्वरूपात काढण्यात आली.

राज्याच्या विविध जिल्ह्यांत आरटीई प्रवेशासाठी ५ मार्च ते ३० मार्चपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार राज्यात एकूण ९ हजार १९५ शाळांमध्ये १ लाख १६ हजार ९२६  प्रवेशाच्या जागा उपलब्ध झाल्या आहेत. तर या जागांसाठी राज्यभरातून तब्बल  २ लाख ४६ हजार ३४ अर्ज उपलब्ध झाले आहेत. पुण्यात ९६३ शाळांमधून १६ हजार ६०४ जागांसाठी सर्वाधिक ५४  हजार १३९ अर्ज आले आहेत.

कशी काढली लॉटरी
राज्यात ज्या शाळेचे सगळ्यात जास्त अर्ज आले आहेत. अशी शाळा प्रातिनिधीक स्वरुपात लॉटरीसाठी निवडण्यात आली आहे. 0 ते 9 क्रमांकाच्या चिठ्या तयार करण्यात आल्या आणि लहान मुलांच्या हस्ते हे क्रमांक काढण्यात आले आहेत. हे क्रमांक एनआयसीला पाठवण्यात येणार असून सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस ऑनलाईन लॉटरी पूर्ण होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.