पुणे – बारा लाख ग्राहकांचा ऑनलाइन बिलभरणा

महावितरणचे प्रयत्न : 202 कोटी रुपयांचा गल्ला

पुणे – महावितरण प्रशासनाला शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील वीज ग्राहकांनीही चांगलाच प्रतिसाद दिला आहे. ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांची संख्या तब्बल 12 लाखांवर पोहचली आहे. महावितरणच्या संकेतस्थळाबरोबरच मोबाइल ऍपद्वारे ऑनलाइन वीज बिल भरण्यास ग्राहकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. दरम्यान, या ग्राहकांनी ऍपद्वारे तब्बल 202 कोटी 7 लाख रुपयांचा ऑनलाइन भरणा केला आहे.

ऑनलाइन पद्धतीने वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांचा ऑनलाइन पद्धतीकडे कल वाढला असून या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

वीज बिलाचा भरणा ऑनलाइन करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात हा आकडा आणखी वाढले, असा विश्‍वास महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील यांनी व्यक्‍त केला.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.