नवी दिल्ली – देशातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेने शुक्रवारी चौथ्या तिमाहीचा आणि सरलेल्या पूर्ण वर्षाचा ताळेबंद जाहीर केला. बॅंकेची अनुत्पादक मालमत्ता आता बऱ्यापैकी कमी झाल्यामुळे चौथ्या तिमाहीत बॅंकेला 838 कोटी रुपयांचा नफा झाला आहे.
गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत बॅंकेला तब्बल 7,718 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. सरलेल्या पूर्ण वर्षात बॅंकेला 3,069 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या वर्षी मात्र अनुत्पादक मालमत्तेमुळे बॅंकेला 4,187 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. बॅंकेचे डोबळ एनपीए 7.53 टक्क्यावर मर्यादित राहिले आहे. जेकी गेल्या वर्षी मार्च अखेरच्या तिमाहीत 10.91 टक्के होते. निव्वळ एनपीए 5. 73 टक्क्यावरून 3.01 टक्क्यावर आले आहे. या घटनाक्रमामुळे शुक्रवारी स्टेट बॅंकेच्या शेअरचा भाव तीन टक्क्यांनी वाढला होता.
कॅनरा बॅंक
चौथ्या तिमाहीत कॅनरा बॅंकेचा तोटा कमी होऊन तो 551 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत बॅंकेला 4859 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.
सरलेल्या पूर्ण वर्षात बॅंकेला केवळ 347 कोटी रुपयांच्या नफ्यावर समाधान मानावे लागले आहे. गेल्या वर्षी मात्र बॅंकेला अनुत्पादक मालमत्ते मुळे 4,222 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. बॅंकेचे ढोबळ एनपीए 11.84% टक्क्यावरून 8.83 टक्क्यावर आले आहे. तर निव्वळ एनपीए 7.48% टक्क्यांवरून 5.37 टक्क्यांवर आले आहे.
अलाहाबाद बॅंक
सार्वजनिक क्षेत्रातील अलाहाबाद बॅंकेला चौथ्या तिमाहीत 3,834 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीत बॅंकेला 3,509 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. दरम्यानच्या काळात बॅंकेला अधिक तरतूद करावी लागल्यामुळे हा तोटा वाढला असल्याचे दिसून येते. सरलेल्या पूर्ण वर्षात बॅंकेचा तोटा 8,457 कोटी रुपये झाला आहे जो की गेल्या वर्षी 4574 कोटी रुपये इतका होता. बॅंकेचे ढोबळ एनपीए 15.96% वरून 17. 55 टक्क्यावर गेले आहे तर निव्वळ एनपीए 5.22 पाच पॉईंट बावीस टक्क्यावर आले आहे.
सिंडीकेट बॅंक
चौथ्या तिमाहीत सिंडीकेट बॅंकेला 128 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या वर्षी बॅंकेला 2195 कोटींचा तोटा झाला होता.