कराड (प्रतिनिधी)– वडगाव ता. कराड गावच्या हद्दीत एसटी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाला आहे. यामध्ये 20 प्रवासी जखमी झाले, असून त्यातील एका जनाची प्रकृती गंभीर आहे. तर या दुर्घटनेत एक प्रवासी ठार झाला आहे. श्रीरंग माने (वय ४०) असे ठार झालेल्याचे नाव आहे. आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
दरम्यान, पुणे- तासगाव ही बस पुण्याकडून तासगाव च्या दिशेने निघाली होती. वडगाव जवळ एसटी आली असता तिचा अपघात झाला. रस्त्याकडील नाल्यांमध्ये एसटी जाऊन पलटी झाली. जखमींना गावकऱ्यांनी मदत केली असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे.