मुंबई – दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आधीच्या संभाव्य वेळापत्रकाबाबत 22 मार्चपर्यंत लेखी स्वरूपात सूचना मागविण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या सूचनांनुसार हे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
अंतिम वेळापत्रकानुसार, दहावी बोर्डाची लेखी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या दरम्यान घेतली जाणार आहे. तर बारावी बोर्डाची लेखी परीक्षा ही 23 एप्रिल ते 21 मे 2021 या कालावधीत होणार आहे.
परीक्षाच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत मात्र, करोनामुळे यंदाच्या वर्षी ही परीक्षा कशी होणार याबाबत अजून काही माहिती पुढे आलेली नाही. तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा कधी होणार हे शाळा आणि काॅलेजांना परीक्षेच्या आधी कळविण्यात येणार आहे.