कामशेत, (वार्ताहर) – राज्यभरात दहावीच्या परीक्षेला सुरवात झाली असून कामेशेत येथील पंडित नेहरू विद्यालय परीक्षा केंद्रातही परीक्षेला शांततेत सुरवात झाली. या केंद्रावर ६६० परीक्षार्थी विद्यार्थी आहेत.
या वेळी परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थांंचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डी. व्ही. साबळे, कार्लाचे मुख्याध्यापक संजय वंजारे, जैन इंग्लिश स्कुलच्या मुख्याध्यापिका संगीता मनोज यांंच्या हस्ते विद्यार्थ्यांनी गुलाब पुष्प देण्यात आले.
कामशेत केंद्रामध्ये पंडित नेहरू विद्यालय, जैन इग्लिश स्कूल, महर्षी कर्वे आश्रम शाळा, जिजेस इंग्लिश मीडियम स्कूल, एस. आर. टी. कामशेत, श्री एकविरा विद्या मंदिर, कार्ला, गोल्डन ग्लेड विद्यालय करंजगाव, सांगिसे माध्यमिक विद्यालय या शाळांमधील एकूण ६६० विध्यार्थी परीक्षेला बसले आहेत.
परीक्षा कॉपी मुक्त व शांततेत पार पडावी व विद्यार्थ्यांना कुठलीही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी मावळ पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी व मावळ परीक्षा प्रमुख सुदाम वाळंज यांंच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका डी. व्ही. साबळे , परीक्षा केंद्र प्रमुख व्ही. एस. ठोंबरे , उपसंचालिका संगीता मनोज, उपसंचालक डी. पी .पवार विशेष प्रयत्न करत आहेत.