बॉलीवूडमध्ये अनेक स्टारकिड्सने यशस्वीपणे डेब्यू केले असून आणखी काही स्टारकिड्स डेब्यू करण्यास सज्ज आहेत. श्रीदेवी आणि बोनी कपूरची मुलगी जान्हवी कपूरने चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
आता तिची छोटी बहिण खुशी कपूर बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. सध्या सोशलवर खुशीचे लेटेस्ट फोटो आणि ग्लॅमरस स्टाइलची चर्चा चांगलीच सुरु आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या खुशी कपूरने तिचे सिझलिंगअवतारातील सर्व फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये खुशी लांब पोनीटेलसह बॅकलेस गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
खुशी कपूर झोया अख्तरच्या ‘द आर्चिज’ या चित्रपटातून फिल्मी दुनियेत पाऊल ठेवणार आहे.
‘द आर्चीज’ चित्रपटात खुशीला पाहण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत.
सुहाना खान आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाही या चित्रपटातून डेब्यू करणार आहे.