डेहराडून – उत्तराखंडमध्ये आग लागण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. गेल्या २४ तासांत उत्तराखंडमध्ये पाच ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. या आगीमुळे आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. गढवाल आणि कुमाऊं भागात दोन ठिकाणी आणि राखीव जंगलात एका ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत.
आगीच्या हंगामात आतापर्यंत १२४२ आगीच्या घटना घडल्या आहेत. १६९६.३२ हेक्टर जंगलाला लागलेल्या आगीमुळे संपूर्ण उत्तराखंड प्रभावित झाले आहे. आतापर्यंत गढवालमध्ये ५३२, कुमाऊंमध्ये ५९८ आणि राखीव जंगलात ११२ आगीच्या घटना घडल्या आहेत.
गढवालमधील कुमाऊं येथे लागलेल्या आगीत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. २०२२ मध्ये आगीच्या२१७१ घटना घडल्या असून त्यामुळे ३४१६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. २०२३ मध्ये आगीच्या ७१८ घटना घडल्या आणि त्यावेळी ८६३ हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले. वाढत्या उन्हामुळे आग लागण्याच्या घटना वाढत आहेत.