पुणे – पिंपरी चिंचवड लॉन टेनिस अकादमी(पीसीएलटीए) यांच्या वतीने व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्या संलग्नतेने पीसीएलटीए हौशी टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा निगडी प्राधिकरण टेनिस कोर्ट या ठिकाणी २५ ते २८ जानेवारी या कालावधीत होणार आहे.
स्पर्धेत एकूण १०० हुन अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला असून ही स्पर्धा ३५ वर्षावरील, ५० वर्षावरील एकेरी व दुहेरी, २५ वर्षांवरील गटात होणार आहे. स्पर्धेत एकुण १,०२,००० रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.
Australian Open 2024 : मेलबर्नमध्ये मेदवेदेवचा विजयी धडाका कायम! उपांत्य फेरीत मारली धडक…
स्पर्धेसाठी वाधवाणी कन्स्ट्रक्शन यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक, प्रशस्तिपत्रक व रोख रकमेची पारितोषिके देण्यात येणार असल्याचे स्पर्धा संचालक नंदु रोकडे यांनी सांगितले.