पारनेर – सुपा येथे थंडावलेली अतिक्रमण हटाव मोहीम आज पुन्हा सुरू करण्यात आली. राहिलेले अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने जमीन दोस्त करण्यात आली.अचानक आलेल्या या मोहिमेमुळे टपरीधारकांची एकच धांदल उडाली. जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणात असलेली बसस्थानक परिसरातील भिंत, टपऱ्या काढण्यात आल्या. माजी आमदार नीलेश लंके यांचे पारनेर रस्त्यावर एमआयडीसी चौकातील संपर्क कार्यालय जमीनदोस्त करण्यात आले. सुपा बसस्थानक चौक ते पारनेर रस्त्यावर दि.२५ मे रोजी बांधकाम विभाग, चेतक एंटरप्रायजेस यांच्या वतीने अतिक्रमणांवर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. ही मोहीम सुरू असताना काही अतिक्रमणधारकांनी आम्हाला दि.३० तारखेपर्यंत मुदत देण्यात यावी, अशी विनंती केली. या विनंतीला मान देत अतिक्रमण मोहीम थांबवण्यात आली होती. ३० तारखेचा दिलेला शेवटचा अल्टिमेटम संपल्यानंतर आज पुन्हा शनिवार दि.१ जून रोजी दुपारी २ वाजता मोठा फौजफाटा बसस्थानक परिसरात दाखल झाला. राहिलेले अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. यापूर्वी रस्त्याच्या कडेला असलेल्या फळांची दुकाने, चहा सेंटर, चपलांची दुकाने, कपड्यांची दुकाने, मटन शॉप, पानटपरी, बाजार तळासमोरील अतिक्रमण, सुपा हाईट्स समोरील कंपाऊंड, तसेच शहाजापूर चौकात सुमारे पन्नास वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेले मळगंगा देवीचे मंदिर अतिक्रमणात असल्याने तेही जमीनदोस्त करण्यात आले. औद्योगिक चौक ते नगर – पुणे महामार्ग अंतर्गत अतिक्रमणे देखील काढण्यात आली असून, ही मोहीम दोन दिवस चालणार आहे. अचानक आलेल्या या मोहिमेमुळे टपरीधारकांची एकच धांदल उडाली. जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणात असलेली बसस्थानक परिसरातील भिंत, टपऱ्या जमिनीच्या लेवलला नेल्या जात असल्याने टपरीधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. माजी आमदार नीलेश लंके यांचे पारनेर रस्त्यावर एमआयडीसी चौकात संपर्क कार्यालय होते. हे कार्यालय अतिक्रमणात असल्याने तेही शनिवारी सपाट करण्यात आले. सुपा – पारनेर रस्त्याने घेतला मोकळा श्वास सुपा बसस्थानक चौक ते पारनेर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती. दुकाने रस्त्यावर थाटल्याने वाहतूकीचा नेहमी खोळंबा होत होता. बुधवारी बाजारच्या दिवशी वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली होती. याचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत होता.तर चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते.हे सर्व अतिक्रमणे काढण्यात आल्याने सुपा – पारनेर रस्त्याने प्रथमच मोकळा श्वास घेतला. उर्वरीत नगर- पुणे महामार्गावरील अतिक्रमणे उद्या रविवारी काढण्यात येणार असल्याचे माहिती अतिक्रमण विभागाने दिली.