सोनई | कृषी उत्पन्न भर बाजार समिती घोडेगाव येथून चोरी गेलेल्या कांद्यासंह दोन सराईत आरोपींना सोनई पोलिसांनी ताब्यात घेतले. दि. २९ मे रोजी रात्री १२ वाजेनंतर चोरट्यांनी पत्र्याचे कंपाऊंड तोडून सुमारे ५० हजार रुपये किंमतीच्या कांद्याने भरलेल्या गोण्या चोरीस गेल्याचे लक्षात आल्यावर सोनई पोलीस ठाण्यात भाऊसाहेब दामोदर दातार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. सोनई पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत आरोपी धनंजय आल्हाट (रा. झापवाडी, घोडेगाव रोड), समिर उर्फ काल्या सलिम सय्यद (रा. घोडेगाव) यांनी पकडले. त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. चोरी गेलेला १८००० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मेढे , पोलीस हवालदार दत्ता गावडे, आडकित्ते, पोलीस नाईक. सोमनाथ झांबरे , काॅ. महेंद्र पवार, रवींद्र गर्जे, रामदास तमनर यांनी ही कारवाई केली.