पुणे – धीरज जाधव क्रिकेट अकादमी यांच्या वतीने आयोजित पहिल्या बारामती आंतर कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेत 6 निमंत्रित संघानी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा बारामती येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रिकेट मैदानावर १२ ते २१ जानेवारी या कालावधीत रंगणार आहे.
माजी कसोटीपटू व स्पर्धा संचालक धीरज जाधव यांनी सांगितले की, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेखाली आयपीएल टी -२० च्या धर्तीवर यावर्षी प्रथमच नामांकित कंपन्याना एकत्रित आणून ग्रामीण परिसरातील गुणवान खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी अकादमीच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
BCCI ला खोटं बोलणं इशानला पडणार महागात; कारकीर्दीलाही धोका? जाणून घ्या, नेमकं प्रकरण…
स्पर्धेत बारामती अग्रो, महावितरण (एमएससीबी), जेजुरी इंडस्ट्रियल असोसिएशन (कडेपठार किंग्ज), डेअरी वॉरियर्स, पॅसिफिक अग्रो टेक्नॉलॉजी (वकील संघटना), साहिबा फॅब्रिकेटर्स हे सहा संघ झुंजणार आहेत. स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना आपल्या गुणवत्तेच्या आधारे कंपनीमध्ये नोकरीची संधी निर्माण करणे व ग्रामीण परिसरातील नामवंत कंपन्यांच्या माध्यमातून क्रिकेट संस्कृती रुजविणे हा ही स्पर्धा भरवण्यामागील उद्देश असल्याचे जाधव यांनी नमूद केले.