ओतूर – येथे ग्राम विकास मंडळ ओतूर संचलित चैतन्य विद्यालयामध्ये क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले होते. शालेय स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी खेळाडूंनी क्रीडा ज्योत घेऊन गावातून फेरी काढली. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला विद्यालयाच्या निवृत्त क्रीडा शिक्षिका सुशीला गावडे व सुरेश गावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
अध्यक्षस्थान सुरेश गावडे यांनी भूषविले, अशी माहिती मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पानसरे व क्रीडा विभाग प्रमुख शरद माळवे यांनी दिली. महोत्सवात कबड्डी, खो-खो,लंगडी हे सांघिक खेळ तसेच उंचउडी, लांबउडी, मैदानी स्पर्धांचे आयोजन केले होते. यावेळी तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 60 खेळाडूंचा आणि यांना मार्गदर्शन करणारे अमित झरेकर, शरद माळवे, देवचंद नेहे, सुरेखा ढमाले या क्रीडा शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झालेल्या आयुष शिंगोटे, सानिका वळे, आकांक्षा गाढवे या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष अनिल तांबे, प्रभाकर तांबे, राजेंद्र डुंबरे, रघुनाथ तांबे, सचिव प्रदीप गाढवे, पंकज घोलप, रोहीदास घुले, सीताराम डुंबरे, संजय ढमढेरे, बबन डुंबरे, शिक्षक प्रतिनिधी संतोष कांबळे उपस्थित होते. यावेळी देवचंद नेहे यांनी आभार मानले.