पुणे – पुणे जिल्हा योग संघटना आयोजित जिल्हा योगासन स्पर्धेत गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी बारामतीच्या स्पर्धकांनी आपले वर्चस्व राखले. या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद लाभला.
या स्पर्धा चंद्रशेखर आगाशे विद्यालय, गुलटेकडी येथे पार पडल्या. स्पर्धा स्त्री व पुरुष अशा एकूण चौदा गटांत घेण्यात आल्या. स्पर्धेमध्ये बारामती, इंदापूर, लोणावळा इत्यादी भागातून 235 स्पर्धकांनी उस्फूर्तपणे भाग घेतला. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी देशमुख महाराज फाउंडेशनचे देशमुख महाराज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष योगाचार्य विनायक मुसळे यांनी स्पर्धकांना बहुमोल मार्गदर्शन केले. या स्पर्धेत पंच म्हणून वैशाली गोखले, शैलजा आडकर, तृप्ती आडके, नितीन बांगर, महारुद्र शेटे, महेंद्र निरगुडे व सुनील रोट्टी यांनी पहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाली धोमने यांनी केले, तर आभार जोस्ना रायरीकर यांनी मानले.