पुणे – आयसीएआयच्या पश्चिम विभागीय पुणे शाखेतर्फे नवव्या आर्चर्स वेल्थ सीए आंतरफर्म क्रिकेट लीग स्पर्धेत बीस्मार्ट, एसआरपीए इलेव्हन, फिनप्रो एसेस, स्पाय वॉरियर्स या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत फिनप्रो संघाने रॉयल्स संघाचा 19 धावांनी पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
अन्य लढतीत बीस्मार्ट संघाने एसपीसीएम स्ट्रायकर्स संघाचा 36 धावांनी पराभव करत आगेकूच केली. एसआरपीए इलेव्हन संघाने सी अँड एल टायटन्स संघाचा 10 धावांनी पराभव केला. स्पाय वॉरियर्स संघाने सीए सुपरकिंग्ज संघाचा 16 धावांनी पराभव केला.