पुणे – आर्ट ऑफ लर्निंग इन्स्टिट्यूट योगा टीचर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, दिल्ली यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ऑनलाइन राष्ट्रीय आयकोनिक योगी योगासन स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
या स्पर्धेमध्ये पुण्याच्या विश्रांतवाडीतील मल्लखांब आणि योगा स्पोर्टस अकादमीच्या यशदा निकम आणि सानिका गोंदाणे या मुलींनी राष्ट्रीय स्तरावर 9 ते 15 या वयोगटात द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेमध्ये देशातील जवळपास 250 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.