लखनौ, करमाळी मार्गावर विशेष रेल्वे धावणार

पुणे – उन्हाळी सुट्ट्यांमुळे प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता पुणे ते लखनौ आणि पुणे ते करमाळी मार्गावर विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. पुणे-लखनौ विशेष रेल्वे (01445) पुण्यातून दि. 3 रोजी दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनी सुटून लखनौ येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी पोहोचणार आहे. या गाडीला लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, झाशी, कानपूर येथे थांबा देण्यात आला आहे.

1 एसी थ्री टियर, 8 स्लीपर व 11 जनरल क्‍लास डबे या विशेष रेल्वेला जोडण्यात येतील. त्याचप्रमाणे पुणे-करमाळी विशेष रेल्वे (01409) पुण्याहून दि. 7 रोजी रात्री 10 वाजून 50 मिनिटांनी सुटून करमाळी येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजून 50 मिनिटांनी पोहोचेल. या गाडीला लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधूदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड येथे थांबा देण्यात आला आहे. 2 एसी थ्री टियर, 8 स्लीपर, 11 जनरल सेकंड क्‍लास डबे या गाडीला जोडण्यात येणार आहेत.

दानापूर एक्‍स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल
दानापूर स्थानकात “नॉन-इंटरलॉकिंग’ या तांत्रिक कामासाठी दि. 7 जून ते 17 जून या कालावधीत धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. यामध्ये पुणे-दानापूर-पुणे एक्‍स्प्रेसचा समावेश आहे. पुणे-दानापूर एक्‍स्प्रेस (12149) बिहटा स्थानकापर्यंत धावणार आहे. तर दि. 9 जून ते 19 जूनदरम्यान दानापूर स्थानकातून सुटणारी दानापूर-पुणे एक्‍स्प्रेस (12150) बिहटा स्थानकातून नियोजित वेळी सुटणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.