जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज व्हेरनाॅन फिलँडरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली. जानेवारीत इंग्लंडविरूध्दच्या आगामी कसोटी मालिकेनंतर ३४ वर्षीय फिलँडर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने याबाबतची माहिती सोमवारी दिली.
The end of an era.
Vernon Philander will wave goodbye to international cricket after South Africa's Test series with England.
What are your favourite memories of him playing for South Africa?#SAvENG pic.twitter.com/NKyBWXyi3x
— ICC (@ICC) December 23, 2019
फिलँडरने आपल्या कारकिर्दीत ६० कसोटी, ३० वनडे व ७ टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०११ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध फिलँडरने कसोटीत पदार्पण केले होते. कसोटीत त्याने २२.१६ च्या सरासरीने २१६ बळी मिळवले आहेत. यामध्ये त्याने १३ वेळा पाच बळी घेण्याची किमया केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने अवघ्या ७ सामन्यात ५० विकेट पूर्ण केल्या होत्या.
In an international career that has spanned more than 12 years, Philander has played 97 matches across all three formats, taking a combined 261 wickets with 1784 runs scored. #BigVernRetires @VDP_24 pic.twitter.com/aWh1agEXFG
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 23, 2019
याशिवाय, फिलँडरने ३० एकदिवसीय सामन्यांमध्ये ४१ बळी मिळवले आहेत. त्याला फक्त सात टी-२० सामन्यात प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली, त्याने त्यात फक्त ४ बळी मिळवले आहेत.