केंदूर – तीर्थक्षेत्र केंदूर नगरीमध्ये विद्यमान खासदारांनी किती निधी आणला; मात्र मी आतापर्यंत 12 कामे मार्गी लावली. केंदूरच्या पाणीप्रश्नाची मला जाणीव आहे. त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर पाणीप्रश्नावर पहिली बैठक केंदूरला घेणार असल्याचे आश्वासन महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांनी केंदूर येथे ग्रामस्थांना दिले.
महायुतीच्या शिरुर मतदारसंघातील प्रचारार्थ आयोजित दौर्यानिमित्त ते केंदूर येथे आले होते.त्यावेळी ग्रामदैवत केंद्राई माता मंदिरात जाऊन त्यांनी देवीचे दर्शन घेतले. तर त्यानंतर ग्रामपंचायत चौकात झालेल्या सभेत त्यांनी ग्रामस्थांशी हितगुज केले.
माजी आमदार पोपटराव गावडे, भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदिप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सचिव आबासाहेब पर्हाड, बाजार समितीचे सभापती प्रकाश पवार, आंबेगाव-शिरूर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, भाजपा शिरुरचे उपाध्यक्ष भगवान शेळके,
शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, शिरुरचे शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, पंचायत समिती सभापती राजेंद्र रासकर, उपसभापती सविता पर्हाड, उद्योग आघाडी अध्यक्ष रविंद्र गायकवाड, सरपंच अमोल थिटे, युवासेना जिल्हाचिटणीस वैभव ढोकले, माजी सरपंच सुनील थिटे, सुवर्णा थिटे, माजी उपसरपंच भाऊसाहेब पर्हाड अभिजीत साकोरे, अविनाश साकोरे तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दौर्यात तळपत्या उन्हात देखील ठिकठिकाणी त्यांचे महिलांकडून औक्षण करुन स्वागत करण्यात आले तर काही ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. धामारी, करंदी, जातेगाव, मुखई, हिवरे, खैरेवाडी, खैरेनगर, पाबळ येथे सर्वच ठिकाणी त्यांच्या प्रचार दौर्यात गर्दी दिसून आली.