बॉलीवूडमधीन प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे आकस्मित निधन झाल्याला एक वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने निर्माता भूषण कुमारने त्यांच्यावर बायोपिक बनवण्याची घोषणा केली आहे.
टी-सीरिजच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर ही घोषणा केली गेली आहे. सरोज खान यांच्यावरील बोयोपिकची तयारी आपण करत असल्याचे भूषण कुमारने म्हटले आहे. या बायोपिकसाठी आपण कॉपिराइट मिळवल्याचेही भूषण कुमारने म्हटले आहे.
सरोज खान यांनी हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये वैजयंती माला, श्रीदेवीपासून अगदी अलीकडच्या काळातील माधुरी दीक्षित, ऐश्वर्या रॉयपर्यंत अनेक हिरोईनच्या गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले होते.
त्यांच्या या कारकिर्दीवर आधारित सिनेमाची जुळवाजुळव आता सुरू झाली आहे. सरोज खान यांचा लीड रोल कोण साकारणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
अजून तरी या आव्हानात्मक रोलसाठी योग्य अभिनेत्रीचे नाव डोळ्यांसमोर नाही. पण लवकरच हे नाव निश्चित केले जाईल.
या बायोपिकमधून फिल्म इंडस्ट्रीतील अंदर की बातदेखील पडद्यावर येणार आहे. सरोज खान यांच्या जीवनातील अनेक उतार चढाव आणि संघर्षही प्रेक्षकांसमोर उलगडला जाणार आहे.