मुंबई – लॉकडाऊनच्या काळात प्रवासी कामगारांना सोनू सूदने आपापल्या प्रांतात परतण्यासाठी वाहनांची सोय करून दिली होती. त्याने विदेशात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांना मदतही केली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरण्यापासून ते ऑपरेशनसाठी लागणारा वैद्यकीय खर्च करेपर्यंत सर्व गरजवंतांची गरज सोनू सूदने या काळात पूर्ण केली होती.
West Bengal: A Durga puja committee has chosen the hardships faced by migrant labourers during COVID-induced lockdown as the theme for its puja pandal in Kolkata. The committee has also installed an idol of actor Sonu Sood to honour his service to the labourers during lockdown. pic.twitter.com/dTLlJyetdG
— ANI (@ANI) October 21, 2020
एवढेच नाही तर रोजगार गेलेल्या अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा म्हणून त्याने एका एम्प्लॉयमेंट पोर्टलचीही सुरुवात केली. प्रवासी कामगारांना ही अत्यंत मोलाची मदत केल्याबद्दल अभिनेता सोनू सूदचे सर्वच स्तरांमधून कौतुक झाले होते.
यातच कोलकातातील एका दुर्गोत्सव मंडळाने त्यांच्या पूजा पंडालमध्ये सोनू सूदची मूर्ती लावली आहे. असं करून लोकांनी त्याला देवाचा दर्जाच देऊन टाकलाय. प्रफुल्ला कन्नन वेलफेअर असोसिएशन समितीने या मूर्ती लावल्या आहेत. या लोकांनी त्यांच्या देखाव्याची थीम ‘प्रवासी मजूर’ अशी ठेवली आहे. आपल्या देखाव्यातून लोकांनी सोनू सूदचा सन्मान केलाय.
सोनू सूदनेही मंडळाच्या या सन्मानावर अभिनेता सोनू सूदने प्रतिक्रियाही दिली आहे सोनूच्या या ट्विटरवर लोकांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. सोनूच्या फॅन्सनाही याने फार आनंद झाला आहे.