मुंबई – बॉलीवूड अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनच्या काळात परराज्यात अडकलेल्या कामगारांना आपापल्या घरी जाण्यासाठी मोलाची मदत करत आहे. आतापर्यंत हजारो कामगारांसाठी सोनू सूद हा देवदूत बनून पुढे आला आहे. या कार्यामुळे सर्वांकडून त्याचे कौतुक केले जात आहे. यातच पुन्हा एकदा सोनुने किर्गिस्तान येथे अडकलेल्या जवळपास ३ हजार भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे.
This is to inform to all the students of Kyrgyzstan that it’s time to come home ❣️we are operating the first charter Bishkek -Varanasi on 22nd July.The details of which will be sent to your email id and mobile phones in a while. Charters for other states will also fly this week.
— sonu sood (@SonuSood) July 21, 2020
या माहामारीच्या काळात देशांमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. अशातच किर्गिस्तान येथे शिक्षणासाठी गेलेले जवळपास ३ हजार विद्यार्थी तेथे अडकले आहेत. यातील अनेक विद्यार्थी हे बिहार-झारखंड येथील आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी सोनू सूद प्रयत्न करत आहे. सोनूने ट्विट करुन ही माहिती दिली आहे.