मुंबई – बॉलीवूडच्या दबंग अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी सोनाक्षी सिन्हा जेव्हाही पडद्यावर दिसली तेव्हा तिने काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. ‘दबंग’ या तिच्या पहिल्या चित्रपटापासून आतापर्यंत प्रत्येक वेळी ती वेगळी भूमिका निवडताना दिसली आहे. आता पुन्हा एकदा नव्या रूपात सोनाक्षी चाहत्यांसमोर आली आहे. यावेळी ती एका कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे.
सोनाक्षीच्या आगामी वेब सीरिज ‘दहाड’चा टीझर रिलीज झाला आहे, ज्यामध्ये पोलिसाच्या भूमिकेतील सोनाक्षीचा कडक लूक पाहायला मिळत आहे. ही सिरीज काहीशी वेगळी असल्याचे टीजरवरून समजते. क्राईम थ्रिलर असलेली ही सिरीज बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होती. आता यातील सोनाक्षी सीनचा लूक चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.
टीजरची सुरुवात 27 महिलांच्या मृत्यूच्या गुंतागुंतीने सुरू होते, ज्यांच्या विरोधात कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. मात्र, सोनाक्षी सिन्हा म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक अंजली भाटिया या हत्या प्रकरणांच्या तपासाचे काम हाती घेतात. यावेळी सोनाक्षी सिन्हा साकारत असलेली ही भूमिका तिच्या आजवरच्या भूमिकेपेक्षा खूप वेगळी असल्याचे समजते.
View this post on Instagram
‘दहाड’ची निर्मिती रीमा कागती आणि झोया अख्तर यांनी केली आहे. दहाडचे दिग्दर्शन रीमा कागती आणि रुचिका ओबेरॉय यांनी संयुक्तपणे केले आहे. ‘दहाड’मध्ये सोनाक्षी सिन्हा, विजय वर्मा, गुलशन देवय्या आणि सोहम शाह यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सोनाक्षी यापूर्वी डबल एक्सएल चित्रपटात दिसली होती ज्यामध्ये तिने एक वेगळीच भूमिका साकारली होती.