मुंबई – वाढते वजन ही आजच्या तरुणाईला न आवडणारी गोष्ट आहे. त्यातच जर ती मुलगी असेल तर तिला वाढत्या वजनावरून बरंच काही ऐकून घ्यावं लागत. यावरच आधारित ‘डबल एक्सएल’ या चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिंह मुख्य भूमिकेत दिसत आहेत. टीजरमध्ये दोघीनींही वाढत्या वजनाबाबत हटके डायलॉगमध्ये भाष्य केलं आहे.
टीजरमध्ये सोनाक्षी सिन्हा म्हणते,”मुलांना ब्रा मोठी पाहिजे आणि कंबर छोटी” तर हुमा कुरेशी देखील आपल्या वाढत्या वजनाबाबत बोलताना म्हणते,”श्वास कितीही आत ओढला तरी जिन्हा पँट वरती चढतच नाही. ” एकूणच या दोघीही वाढत वजन आणि मुलांमध्ये त्याबाबत बोलल्या जाणाऱ्या गोष्टींबाबत बोलताना दिसत आहेत. प्रत्येकाच्या रोजच्या जीवनातील हा विषय असल्यामुळे अनेकांना हा टीजर प्रचंड आवडत आहे.
हा चित्रपट १४ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. सतराम रमाणी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात बॉडीवेटसारख्या स्टिरिओटाइप समस्यांवर लक्ष दिले गेले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण भारत आणि ब्रिटनमध्ये झाले आहे. चित्रपटाची कथा 2 महिलांची आहे. एक उत्तर प्रदेशची तर दुसरा नवी दिल्लीच्या अर्बन कॉलनीतील महिला आहे. वाढत्या वजनामुळे दोघीनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो असेच टीजरवरून दिसत आहे.