सोमेश्वरनगर: वडगाव निंबाळकर परिसरात बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. दरम्यान, नुकतीच सुरु झालेली लालपरी पावसात न्हाहून निघाली.
आज झालेल्या पावसामुळे परिसरातील शेतकरी सुखावला आहे. नुकत्याच परिसरातील जमिनीची पेरणीसाठी मशागत झाल्यामुळे त्यावर पाऊस आल्याने वडगाव येथील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
साधारणपणे १ जून’ला शेतकरी आडसाली ऊस लागण करत असतात त्यांनी सध्या शेती मशागत करून उसासाठी ऊस सरी व त्याची तोडणी केलेले आहे. आता त्यांना या पावसामुळे ऊस लावण्यात सहज शक्य होणार असून त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.