नवी दिल्ली – जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu and Kashmir) बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमधील (uri sector) नियंत्रण रेषेजवळ भारतीय सैन्याच्या जवानांनी दिवाळी (Diwali 2023) साजरी केली.दिव्याचा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतिक म्हणून साजरा केला जातो. सीमेवरील जवान प्रत्येक सण येथे उत्साहाने साजरे करीत असतात.
दिव्यांचा हा सणही तेथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो. आज या सैनिकांनी सोनी गावातील (Soni villege) ग्रामस्थांबरोबर या सणाचा आनंद साजरा केला. स्थानिक लोक आणि लष्करी जवान नियमितपणे होळी, ईद आणि रक्षाबंधन सारखे सण साजरे करत आहेत.
आज दिवाळीनिमीत्त लष्कराच्या जवानांची तुकडी सोनी गावात पोहोचली जिथे घरे दिव्यांनी सजवली गेली. ढोल आणि फुलांनी सैनिकांचे स्वागत करण्यात आले. यानंतर मिठाई आणि आनंदाची देवाणघेवाण झाली.
आपल्या घरापासून शेकडो किलोमीटर दूर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांसोबरत हा पवित्र सण साजरा करण्याची संधी मिळाल्याने गावकऱ्यांनी जल्लोष आणि निखळ आनंद व्यक्त केला.गावच्या सरपंचाच्या भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली, त्यांनी सैनिकांच्या निस्वार्थ सेवेबद्दल आणि सर्व परिस्थितीत स्थानिकांच्या खांद्याला खांदा लावून मदत दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.