काबुल : अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ घनी आपल्या कुटुंबासह देश सोडला. सध्या ते अबू धाबीमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. संयुक्त अरब अमीरात (यूएई) च्या विदेश मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरादेखील दिला आहे. तसेच युएईने घनी यांना आश्रय का दिला यावरही स्पष्टीकरण दिले आहे.
यूएईच्या विदेश मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, मानवतेच्या दृष्टिकोनातून अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ घनी आणि त्यांच्या कुटुंबियांना आश्रय दिला आहे. दरम्यान, अशरफ घनी आणि त्यांचे कुटुंबिय अबू धाबीमध्ये नक्की कोणत्या भागांत आहेत, यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.
संयुक्त अरब अमीरात (यूएई) ने म्हटले आहे की, त्यांनी अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ घनी आणि त्यांच्या कुटुंबियांना मानवतेच्या दृष्टिकोनातून स्विकारलं असून त्यांना आश्रय दिला आहे.
अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडला. त्यानंतर तालिबानी (Taliban) दहशतवाद्यांनी काबूलवर कब्जा मिळवला आहे. देश सोडल्यानंतर आता अशरफ गनी यांनी स्वतः खुलासा केला आहे. या खुलासात त्यांना अफगाणिस्तान का सोडावे लागले हे फेसबूकवर पोस्ट करत सांगितले आहे.