मुंबई – गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीवरून चांगलेच राजकारण तापले आहे. आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीबाबत एक ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी पंतप्रधानांची डिग्री थेट संसद भवनच्या गेटवर फ्रेम करून लावण्याचा सल्ला दिला आहे.
काल संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील याबाबतचा मुद्दा मांडला होता. त्यानंतर आता संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये डिग्रीचा फोटो देखील शेअर केला आहे.
आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत म्हणतात,”आपल्या पंतप्रधान मोदीजींची ही पदवी बोगस आहे असे लोक म्हणतात, पण ‘एंटायर पॉलिटिकल सायन्स’ या संशोधन विषयावरील ही ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पदवी आहे असे माझे मत आहे. ती फ्रेम करून नवीन संसदेच्या मुख्य गेटवर टांगली पाहिजे. जेणेकरून कोणी पंतप्रधानांच्या योग्यतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये”
हमारे प्रधानमंत्री मोदीजी की ये जो डिग्री है,लोग कहते हैं कि यह बोगस है, लेकिन मैं मानता हूं कि ‘Entire Political Science’ शोध विषय पर ये ऐतिहासिक व क्रांतिकारी डिग्री है.इसे नए संसद भवन के मुख्यद्वार पर फ्रेम करके लटकाना चाहिए.ताकि लोग प्रधानमंत्री जी की योग्यता पर सवाल न उठाएं. pic.twitter.com/d5dnL4nZvk
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 3, 2023
पंतप्रधानांची डिग्री नेमकी काय आहे ती सार्वजनिक करा अशी मागणी आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी माहिती अधिकारा खाली निवडणूक आयोगाकडे केली होतीसात वर्षांपूर्वीचे हे प्रकरण आहे. त्यावेळेसच्या निवडणूक आयोगाने डिग्री सार्वजनिक करण्याबाबत आदेशही दिले होते. मात्र गुजरात हायकोर्टाने याबाबत निर्णय दिला असून निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय न्यायालयाने रद्द केला आहे. तर पंतप्रधानांची डिग्री मागणाऱ्या केजरीवालांना दंड ठोठावला आहे. यावरूनच आता विरोधकांनी राजकारण करायला सुरुवात केली आहे.