…म्हणून विराट कोहलीशी लग्न केले; अनुष्काचा खुलासा

नवी दिल्ली – बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली या जोडीचे अनेक चाहते आहेत. विराट आणि अनुष्का इटलीमध्ये ११ डिसेंबर २०१७ साली विवाहबंधनात अडकले होते. यानंतर सोशल मीडियावर विराट-अनुष्काच्या विवाहाचे फोटो अनेक दिवस व्हायरल झाले होते. अनुष्का शर्माने विराटसोबत लग्न का केले? हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. या प्रश्नाचे उत्तर तिने स्वतः एका शोमध्ये दिले आहे.

अनुष्का म्हणाली कि, माझे विराटवर खूप प्रेम असल्याने त्याच्यासोबत लग्न केले. तसेच कोणच्याही विवाहित आयुष्य त्यांच्या करिअर आणि लोकप्रियतेवर कोणताही प्रभाव टाकत नाही. म्हणून मी विराट कोहलीशी लवकर लग्न केले.

ती पुढे म्हणाली, चाहत्यांना केवळ आम्ही स्क्रीनवर एकत्र आवडतो. आम्ही विवाहित आहोत किंवा आई आहोत अशा वैयक्तिक गोष्टींनी चाहत्यांना काही फरक पडत नाही. मी २९ व्या वर्षी लग्न केले. हे वय एका हिरोईनसाठी कमी असते. जेव्हा एक पुरुष लग्नावेळी आपल्या करिअरबाबत विचार नाही करत तर महिलेने का करावा? असा सवालही अनुष्काने विचारला.

Leave A Reply

Your email address will not be published.