#SLvIND : नवोदितांनी संधी दवडली – द्रविड

कोलंबो – कृणाल पंड्याला करोनाची बाधा झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांना उर्वरित दोन टी-20 सामन्यांत खेळता आले नाही. त्यांच्या जागी नवोदितांना संधी दिली गेली. मात्र, या संधीचा लाभ घेण्यात ते कमी पडले, अशा शब्दांत श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेचे समीक्षक भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी केली आहे.

पंड्या करोनाबाधित झाल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या भारतीय क्रिकेट संघातील तब्बल नऊ खेळाडूंना विलगीकरणात पाठवले गेले होते.

अशा परिस्थितीत श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेच्या दुसऱ्या व तिसऱ्या सामन्यात नेट गोलंदाजांचा समावेश करत भारतीय संघाला मैदानात उतरावे लागले.

करोना प्रतिबंधक नियमांमुळे भारतीय संघ व्यवस्थापनाकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. देवदत्त पडिक्‍कल, ऋतुराज गायकवाड, नितीश राणा आणि चेतन साकरिया यांनी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, त्यांना संधीचा लाभच उठवता आला नाही, असेही द्रविड म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.