Tokyo Olympics : दोन राउंड जिंकूनही मेरी हरली कशी

प्रशिक्षक छोटेलाल यादव यांचा सवाल

टोकियो – भारताची सहा वेळची विश्‍वविजेती मेरी कोमला पराभवाचा सामना करावा लागला असला तरीही तिने तीनपैकी दोन राउंड जिंकूनही असे कसे घडले, असा सवाल तिचे प्रशिक्षख छोटेलाल यादव यांनी केला आहे.

या सामन्यात मेरीने तीनपैकी दोन राउंड जिंकले होते आणि तरीही तिला पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी पंचांच्या निर्णयावर मेरी कोम निराश झाली होती. गुणांचा फरक पाहून तिचे प्रशिक्षकदेखील संतापले होते. पहिल्या फेरीत एकमेकांचे डावपेच हेरण्याचाच प्रयत्न दोन्ही खेळाडूंनी केला. त्यानंतर मोरीने दोन फेऱ्या जिंकल्या. तरीही ती पराभूत कशी झाली हेच प्रशिक्षकांसह क्रीडाप्रेमींनाही समजले नाही.

यंदाच्या ऑलिम्पिकमधील गुण पद्धतीच उमगलेली नाही. मेरी पहिल्या राउंडमध्ये 1-4 अशी पिछाडीवर कशी होती. दोन्ही खेळाडूंची गुणसंख्या समान असतानाही असे कसे घडले.

पाच पैकी चार पंचांनी 10-9 गुणांनी वॅलेन्सियाच्या बाजूने निकाल दिला, तर पुढील दोन राउंडमध्ये पाचपैकी तीन जणांनी मेरीच्या बाजूने निकाल दिला. पण तरीही एकूण गुणांमध्ये वॅलेन्सियाने बाजी मारली. हे सर्वच अनाकलनीय आहे, असे यादव म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.