बंगळुरूत दहशतवाद्यांचे स्लीपर सेल कार्यरत

बंगळुरू- बंगळुरू आणि म्हैसूरमध्ये काही अतिरेकी संघटनांचे स्लीपर सेल्स कार्यरत असून किनारावर्ती कर्नाटक व बंगालच्या उपसागरात त्यांच्या करवाया वाढल्या आहेत, अशी माहिती कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी दिली.

म्हैसूर येथे पत्रकारांशी बोमई बोलत होते. ते म्हणाले, जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश (जेएमबी) या संघटनेचे दहशतवादी किनारावर्ती कर्नाटक आणि कर्नाटकच्या काही अंतर्गत भागात कार्यरत असल्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) संशय आहे. बंगळुरू आणि म्हैसूरमध्ये स्लीपर सेल्स कार्यरत असण्याची शक्‍यता आहे त्यामुळे अधिक सर्तक रहावे अशी सुचना एनआयएने आम्हाला केली आहे, असे बम्मई म्हणाले.

फक्त किनारवर्ती आणि अंतर्गत कर्नाटकच नव्हे तर बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्राच्या किनारपट्टीच्या प्रदेशातही जेएमबीने आपल्या कारवाया वाढवल्या आहेत. नुकत्याच एनआयएने नवी दिल्लीत दिलेल्या माहितीचा उल्लेख करत बोम्माई म्हणाले की एनआयएने काश्‍मीर आणि बांगलादेशी दहशतवाद्यांच्या हालचालींवर लक्ष केंद्रीत केले आहे. राज्यात राज्यात बेकायदा घुसखोरी केलेल्या बांगलाद्रशी घुसखोरांची संख्याही वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर, आमचे पोलिस विशेषत: बंगळुरू आणि म्हैसूरमध्ये सतर्क आहेत. बोम्माई म्हणाले, आम्ही सार्वजनिक ठिकाणी लोकांची चौकशी करत आहोत. संशयास्पद व्यक्तींविषयी माहिती गोळा करून त्याचे विश्‍लेषण करीत आहोत. या आठवड्यात घोषणा केलेले बंगळुरू विशिष्ट दहशतवादविरोधी पथक (एटीएस) एनआयएच्या अधिकाऱ्यांसमवेत काम करेल. त्याची ुसरवात एक नोव्हेंबर पासून होईल. खरे तर कर्नाटकात आधीपासूनच एटीएस आहे. पण विशीष्ठ र्पकारच्या दहशतवादी कारवायांसाठी हे पथक नेमण्यात आले.

बंगळुरू आणि परिसरातून अनेक जेएमबी दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून वर्षभरात स्फोटके आणि इतर अनेक साहित्य जप्त केले. एनआयएच्या म्हणण्यानुसार पश्‍चिम बंगालमधील बर्दवान येथे 2 ऑक्‍टोबर 2014 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात दोन जण मरण पावले होते. त्यारील सहभागी आरोपींना बंगळुरु परिसरातून अटक करण्यात आली होती. त्यांनी तामिळनाडूच्या शेजारच्या कृष्णगिरी डोंगरावर घातपाताचे प्रशिक्षण घेतले होते आणि देशभरात जिहादी कारवाया करण्यासाठी येथे तळ उभारण्याच्या तयारीत होते, असे एनआयएच्या तपासात उघडकीस आले होते.

नवी दिल्ली येथे दहशतवादविरोधी पथकाच्या प्रमुखांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना एनआयएचे प्रमुख वाय.सी. मोदी म्हणाले होते की जेएमबीने बांगलादेशी स्थलांतरितांच्या माध्यमातून झारखंड, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ यासारख्या राज्यांत आपले जाळे पसरवले आहे. त्यांना त्याचा विस्तार देशभर करायचा आहे. आणि विविध राज्यातील 125 संशयित अतिरेक्‍यांची यादी त्यांनी दिली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)