कुलस्वामी मेडिकल फाउंडेशन संस्थेअंतर्गत या वर्षी आम्ही विविध प्रकारच्या नव्या सोयी सुविधा उपलब्ध केल्या त्यात सुमन पुनर्वसन व व्यसनमुक्ती केंद्रासोबत ग्रामीण भागातील दुसरी मोठी लोकांची,तरुण -तरुणींची गरज म्हणजे त्वचा आणि सौन्दर्य समस्या!
बऱ्याचदा मी पहायचे की अनेक लोक डॉक्टरांच्या सल्या शिवायच स्वतः च काहीतरी त्वचेच्या समस्यांवर विचित्र उपचार करत असत, त्यात मेडिकलमध्ये जाऊन विविध क्रीम लावणे, स्टिरॉइड चा गैरवापर करणे,कुठलाही पाला त्वचेला लावणे इत्यादी प्रकारचे अनेक उपद्व्याप त्वचेवर किंवा चेहऱ्यावर करताना दिसत. ओपीडीत आले की मूळ समस्या सोडून या स्वयंघोषित उपचारावरील दुष्परिणामावरच उपचार करावे लागत. त्यातून अनेक तरुण मुलामुलींना त्वचेच्या/चेहऱ्याच्या समस्येमुळे आलेले नैराश्य, अपराधीपणाची भावना, नकारात्मकता, कॉलेजला गैरहजेरी आणि अशा प्रकारच्या अनेक समस्या साफ निदर्शनास यायच्या.
मग दर बुधवारी-गुरुवारी मी आळेफाटा येथे नियमित येणे सुरू केले. विविध कॉलेजच्या तरुणी मला येऊन सांगत की, मॅडम, मला पण छान दिसायचंय, मला चेहऱ्यावरील केस काढायचेत, गोंदण काढायचंय, चेहऱ्यावरील डाग, गडडे, तारुण्यापिटीका नको आहेत, चेहरा सुंदर करायचाय.
औषधे , योग्य आहार , झोप, व्यायाम , तणावाचे योग्य नियोजन या सोबत मशीन किंवा लेझर उपचारासाठी पुण्यात माझ्याकडे भरपूर लोक येतात. उपचार घेतात पण ग्रामीण भागात हे कसे शक्य होईल, याचा उपयोग लोकांना होईल का, लोक ते उपचार घेतील का असे अनेक प्रश्न मनात येऊ लागले.
या लेझर उपचारात कोणकोणती मशीन्स असतात, त्याचे काय फायदे होतात, याची ओळख लोकांना झाली, तरच उपचारही होतील. यावर्षी अनंतराव कणसे वैद्यकीय महाविद्यालयात आम्ही त्वचेच्या विविध समस्यांवर लेझर उपचार केंद्र सुरू केले की शहरी भागात त्याच उपचाराचे दर खूप असतात पण येथे त्याच सुविधा कमी खर्चात उपलब्ध करून घ्यायचे आम्ही ठरवले. यात प्रामुख्याने आम्ही खालील प्रकारची लेझर व सौंदर्य समस्येवर उपचार करण्यासाठी उपकरणे आणली आहेत.