मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भुंकप घडला आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीमध्येही मोठी फूट पडली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांनी दिलेला अल्टिमेटम शरद पवारांनी मान्य न केल्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आज शपथविधी सोहळा पार पडला आहे. यावर आता भाजपचे नेते नारायण राणे यांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवारांच्या गुगलीवर सिक्सर ! देवेंद्र फडणवीस यांच्या यॉर्करवर राष्ट्रवादीचा त्रिफळा उडाला. उध्दव ठाकरे हिट विकेट आणि संजय राऊत स्वत:च्या पायात अडकून पडून रन आऊट. @Dev_Fadnavis यांचे अभिनंदन!
— Narayan Rane (@MeNarayanRane) July 2, 2023
नारायण राणे यांनी ट्वीट करत लिहिले की, “शरद पवारांच्या गुगलीवर सिक्सर ! देवेंद्र फडणवीस यांच्या यॉर्करवर राष्ट्रवादीचा त्रिफळा उडाला. उध्दव ठाकरे हिट विकेट आणि संजय राऊत स्वत:च्या पायात अडकून पडून रन आऊट.” यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदनही केले आहे.