वॉशिंग्टन – 21 व्या शतकात जगाला मोठा त्रास देणाऱ्या वायुप्रदूषणाचे अनेक नवीन पैलू समोर येत आहेत. अमेरिकेत झालेल्या एका ताज्या संशोधनाप्रमाणे वायू प्रदूषणाचा फटका गर्भवती महिलांनाही बसला असून 2019 या एका वर्षात 60 लाख पेक्षा जास्त मुले केवळ वायु प्रदूषणामुळे वेळेआधीच जन्माला आली आहेत.
अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमधील कॅलिफोर्निया विद्यापीठाने केलेल्या संशोधनात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून जगातील दोनशे चार देशांमध्ये हे संशोधन करण्यात आले.
तेव्हा गर्भवती महिलांवर वायुप्रदूषणाचा मोठ्या प्रमाणावर नकारात्मक परिणाम होत. असल्याचे लक्षात आले जगातील दक्षिण पूर्व आशिया आणि आफ्रिका या भागांमध्ये महिलांना वायुप्रदूषणाचा सर्वात जास्त त्रास होत.
असल्याचे लक्षात आले वायु प्रदूषणाला केवळ वाहतूक किंवा औद्योगिक कंपन्यांमध्ये निर्माण होणारा धूर जबाबदार नसून घरातील धूर सुद्धा महिलांना त्रासदायक ठरत आहे. जगातील ज्या देशांमध्ये अद्यापही घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी लाकूड कोळसा किंवा इतर तत्सम इंधनाचा वापर केला जातो. त्या ठिकाणी वायु प्रदूषणाचे प्रमाण जास्त असून त्याचा परिणाम गर्भवती महिलांवर होतो.
या संशोधनात दिलेल्या माहितीप्रमाणे केवळ मुलांचा जन्म वेळेआधी होतो असे नाही तर अनेक वेळा महिलांच्या गर्भपातालाही हे वायुप्रदूषण कारणीभूत असते जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीप्रमाणे दरवर्षी वेळेआधी जन्माला आलेल्या किमान दहा लाख बालकांचा मृत्यू होत.
असतो तर जिवंत राहणार्या बहुतेक बालकांचे वजन कमी असते. आणि त्यांना इतर आजारांचा त्रास होत असतो घराबाहेरील आणि घरातील वायुप्रदूषणावर नियंत्रण ठेवले तर गर्भवती महिलांचे जगणे सुसह्य होईल असेही या संशोधनात म्हटले आहे