पुणे – सातत्याने बदली होत असल्याच्या कारणास्तव एका पोलीस निरीक्षकाने थेट कंट्रोल रूमला फोन करून आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे आयुक्तालयात धावपळ उडाली होती. यानंतर संबंधित पोलीस निरीक्षकाचे मनपरिवर्तन करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
प्रशासकीय कारणास्तव संबंधित निरीक्षकाची गेल्या काही दिवसांत दोन ते तीनवेळा बदली झाल्यामुळे त्यांना नैराश्य आले होते. त्यामुळे पोलीस निरीक्षकाने गुरुवारी सकाळी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून आत्मदहनाचा इशारा दिला. त्यानंतर नियंत्रण कक्षातून तातडीने माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानुसार त्यांचे समुपदेशन करून नोटीस बजावून असे कृत्य न करण्याची ताकीद देण्यात आली.