पुणे – येत्या गुरूवारी (दि. 9) रोजी महावितरणकडून तातडीने देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या वडगाव जलकेंद्र व राजीव गांधी पंपिंगच्या अंतर्गत येणाऱ्या भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पाणीपुरवठा सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत बंद राहणार आहे. तर याच दिवशी सायंकाळी 5 नंतर उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग
हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग 2 वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.