Ajay Devgn Injury: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) त्याच्या दमदार अभिनयासाठी लोकप्रिय आहे. सध्या तो सिंघम 3 या चित्रपटासाठी काम करत आहे. काही दिवसांपूर्वी सिंघम 3 च्या सेटवर एक अॅक्शन सीन शूट करताना अजय देवगणच्या डोळ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला. मात्र अद्याप त्याची जखम पूर्णपणे बरी न झाल्याचे म्हंटले जात आहे.
अजय देवगणच्या दुखापतीमुळे आता सिंघम 3 चे शूट रद्द करण्यात आले आहे. या चित्रपटाचे शूटिंग एका आठवड्यापूर्वी मुंबईत सुरू होणार होते. पण या चित्रपटाची टीम हैदराबादमध्ये शूटिंग करेल. कारण चित्रपटाच्या शूटिंगच्या तारखा आधीच निश्चित केल्या गेल्या आहेत. मुंबईमध्ये डिसेंबर 2023 मध्ये रद्द करण्यात आलेले चित्रपटाचे शूटिंग आता हैदराबादमधील शूटिंग पूर्ण झाल्यानंतर पुन्हा केले जाईल. परंतु सिंघम 3 च्या शूटिंगबाबत निर्माते किंवा अजय देवगणकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र अजय देवगण जखमी झाल्यामुळे ‘सिंघम 3’ ची शूटिंग सध्यातरी रद्द करण्यात आल्याचे म्हंटले जात आहे.
‘सिंघम अगेन’ या चित्रपटाबाबत सांगायचे झाले तर, या सिनेमाचं दिग्दर्शन रोहित शेट्टी (Rohit Shetty) करत आहे. या सिनेमात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. अजयसह करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि दीपिका पादुकोण देखील या सिनेमाचा भाग आहेत. रणवीर सिंह आणि अक्षय कुमार देखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रोहित शेट्टीचे ‘सिंघम’ आणि ‘सिंघम रिटर्न’ हे दोन्ही चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर सिंघम अगेनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. रोहित शेट्टीचा हा चित्रपट 2024 मध्ये रिलीज होणार आहे.