मुंबई – मनोरंजन विश्वात सध्या भाषेचा वाद वाढत चालला आहे. बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि किच्चा सुदीप यांच्यात राष्ट्रभाषेवरून सुरू झालेल्या वादाला आता नवे वळण लागले आहे. अनेक सेलिब्रिटींनी या प्रकरणी आपले मत उघडपणे मांडले आहे. त्याचबरोबर या वादात आता गायक सोनू निगमचेही उडी घेतली आहे.
सोनू निगम प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मुक्तपणे मांडण्यासाठी ओळखला जातो. नुकताच तो एका कार्यक्रमात पोहोचला होता. यावेळी त्याला या विषयावर प्रश्न विचारला असता तो म्हणाले, आपल्या संविधानात कुठेही हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असल्याचे लिहिलेले नाही. हिंदी ही भारतभरात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असू शकते, पण आपली राष्ट्रभाषा नाही. असे सोनू निगमने आपले मत मांडले.
पुढे तो म्हणाला की तमिळ ही सर्वात जुनी भाषा आहे. तमिळ ही जुनी भाषा आहे की संस्कृत आहे यावर लोकांमध्ये अनेकदा वाद होतात, परंतु लोक म्हणतात की सर्वात जुनी भाषा तमिळ आहे. देशात नवीन प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा देशातील इतर प्रश्न सोडवणे चांगले आहे. ज्याला जी भाषा सोयीची वाटते त्या ती बोलू द्या. भाषेवरून देशात लोकांमध्ये फूट पाडू नका, आधीच अनेक अडचणी सुरू आहेत.
दरम्यान, अजय देवगण आणि किच्चा सुदीप यांच्यात ट्विटरवर भाषेवरून वाद झाला होता. किचा सुदीप याने हिंदी ही राष्ट्रभाषा नसल्याचे म्हटले होते. यानंतर अजय देवगणने किच्चा सुदीपला ट्विट करून म्हटले होते की, जर हिंदी राष्ट्रभाषा नसेल तर तुम्ही तुमचे चित्रपट हिंदीत डब करून का रिलीज करता? यावर किच्चा सुदीप म्हणाला होता की, बोलण्यात गैरसमज झाला आहे. तेव्हापासून हे प्रकरण वाढतच चालले आहे.