Ajay Devgn: अभिनेता अजय देवगणच्या (Ajay Devgn) आगामी चित्रपटाची चाहते नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतात. अनेक चित्रपटांमध्ये त्याने दमदार कामगिरी केली आहे. अजय देवगणचा रेड सिनेमा सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांची मन जिंकली होती. त्यानंतर आता 2024 मध्ये या सिनेमाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
निर्माता आणि दिग्दर्शक अभिषेक पाठकने ‘रेड 2’चं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये एका व्यक्तीचे पाय दिसून येत आहेत. ‘रेड 2’ साठी अयम पटनायक परतला आहे, असं या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे. सध्या हे पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहतेही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.
View this post on Instagram
अभिषेकने ‘रेड 2’चं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, ” आणखी एक केस सोडवण्यासाठी आयआरएस ऑफिसर अमय पटनायक परतला आहे. 15 नोव्हेंबर 2024 रोजी नाट्य आणि रहस्य पाहायला सज्ज व्हा”. ‘रेड 2’ हा सिनेमा 15 नोव्हेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार असल्याचे या पोस्टरद्वारे जाहीर करण्यात आले आहे.
‘रेड 2’ या सिनेमाचे शूटिंग दिल्ली, उत्तर प्रदेश, मुंबई आणि राजस्थानमध्ये होणार आहे. राजकुमार गुप्ता या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. अजय ‘रेड 2’ या सिनेमासह ‘सिंघम अगेन’, ‘औरें में कहां दम था’ आणि ‘मैदान’ या सिनेमात देखील पाहायला मिळणार आहे.