आता नायब तहसीलदारांकडे स्वाक्षरीचे अधिकार
नगर – “आपले सरकार’ या संकेतस्थळावरून काढण्यात येणारा संगणकीकृत सात-बारा उताऱ्यामध्ये सुसुत्रता राहण्याच्या दुष्टीने व तसेच तांत्रीक अडचणी येवू नयेत या दृष्टीने असे उतारे तालुक्यातील एका अधिकऱ्यांकडून संगणकीकृत निर्गमित करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने संबंधित तालुक्यातील नायब तहसिलदार(महसूल) यांच्या स्वाक्षरीने दिले जाणार आहेत.
तसेच महाभूमि या संकेतस्थळावरून वितरीत करण्यात येणारे संगणकीकृत सात बारा उतारा हा पूर्वी प्रमाणेच संबंधित गावच्या तलाठी यांच्या संगणकीकृत स्वाक्षरीने देण्यात येणार आहे. तहसील कार्यालयातील फेरफार कक्षा मधून काढण्यात येणारा गाव सातबारा उतारा संगणकीकृत उतारा हा संबंधित तालुक्यातील नायब तहसीलदार यांच्या हस्तलिखीत स्वाक्षरीने निर्गमीत करण्यात येणार आहे. हे उतारे डिजीटल स्वाक्षरीत होईपर्यंत तात्पुरती व्यवस्था करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या वेळेत बचत होणार आहे.