टीव्ही कलाकार श्वेता तिवारीची कन्या पलक ही लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिच्या या पदार्पणाच्या सिनेमाचे नाव नुकतेच उघड झाले आहे. एवढेच नाही, तर या सिनेमातील पलकचा फर्स्ट लुकदेखील रिलीज झाला आहे. या सिनेमाचे नाव “रोजी : द सॅफरसन चॅप्टर’ असे असणार आहे.
सिनेमाच्या पोस्टरमध्ये पलकचा ग्लॅमरस लुक बघायला मिळतो आहे. पलकच्या पहिल्या सिनेमाचे दिग्दर्शन विशाल मिश्रा करणार आहे. मंदिरा एन्टरटेन्मेंट, विवेक ओबेरॉयची प्रॉडक्शन कंपनी ओबेरॉय मेगा एन्टरटेन्मेंट आणि प्रेरणा व्ही. अरोरा मिळून या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. विवेक ओबेरॉयनेच पलकचा फर्स्ट लुक शेअर केला आहे.
“ही आहे आमची मिस्टरी गर्ल’ असे त्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. “रोजी…’ हा एक हॉरर थ्रिलर सिनेमा असणार आहे. मुख्य म्हणजे गुरुग्राममधील सत्य घटनांवर या सिनेमातील काही कथाभाग आधारलेला असणार आहे.
स्वतः पलक तिवारीनेही आपला फर्स्ट लुक इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पलक नेहमीच सोशल मीडियावर स्वतःचे वेगवेगळे फोटो शेअर करत असते. श्वेता तिवारी आणि तिचे पहिले पती राजा चौधरी यांची ती कन्या आहे.