मुंबई – चित्रपट महोत्सव म्हंटले की व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’. सर्वात जुना आणि लोकप्रिय असलेला चित्रपट महोत्सव म्हणून या चित्रपट महोत्सवाला औरखले जाते.
तब्बल वीस वर्षांनंतर व्हेनिस चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात एका ‘भारतीय’ चित्रपटाची निवड झाली आहे. अभिमानाची गोष्ट हि आहे की हा चित्रपट ‘मराठी’ आहे. तरुण दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याचा ‘द डिसायपल’! त्रिवार अभिनंदन चैतन्यआणि टिम 👍🙏♥️
— Ravi Jadhav (@meranamravi) July 30, 2020
१९३२ साला पासून या महोत्सवाला सुरुवात झाली असून तब्बल २० वर्षांनी एका भारतीय चित्रपटाची निवड झाली आहे. याबाबत ची सविस्त माहिती चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव यांनी ट्विट करत ही माहिती दिली.
तब्बल २० वर्षांनंतर भारतीय चित्रपट व्हेनिस चित्रपट महोत्सवात पोहोचला असून, महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे हा चित्रपट मराठी आहे.
दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे याचा ‘द डिसायपल’ या चित्रपटाची ७७ व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात निवड करण्यात आली आहे. त्यामुळे रवी जाधव यांनी दिग्दर्शक आणि संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं आहे.