सॅमसंगची बिग ऑफर, ऑनलाइन शॉपिंगवर मिळवा मोठा फायदा

नवी दिल्ली – ऑनलाइन शॉपिंग वाढवण्यासाठी तसेच युजर्संना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने एक नवीन ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत युजर्संना मोठा फायदा मिळणार आहे. तसेच या ऑफर मुळे भारतीय ऑनलाइन बाजारात सॅमसंग कंपनीचे पाय आणखी मजबूत होणार आहे.

गेले अनेक वर्षांपासून भारतीय बाजार पेठेत आपल्या आकर्षक मोबाईल मुळे ग्राहकांचे मने जिंकणारी सॅमसंग कंपनी आपल्या युजर्ससाठी खास ऑफर घेऊन आली आहे. यात सॅमसंग रेफरल प्रोग्राम, सॅमसंग स्टूडेंट प्रोग्राम आणि सॅमसंग शॉपवर 20  हजार रुपयांपर्यंत फायदे युजर्संना मिळणार आहेत. कंपनीने या ऑफर्सच्या माध्यमातून जास्तीत जास्त युजर्संना आपल्या ऑनलाइन स्टोरकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

काय आहे, सॅमसंग ची ऑफर –

सॅमसंग आपल्या अॅपवर 20 हजार रुपयांपर्यंत बेनिफिट्स देत आहे. ही ऑफर ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणार आहे. या ऑफर अंतर्गत युजर 10 शॉपिंग व्हाऊचर अनलॉक करू शकतील. या 10 व्हाऊचर मध्ये युजर्संना 20 हजार रुपयांपर्यंत शॉपिंग व्हॅल्यू मिळणार आहे.

यासाठी तुम्हाला सॅमसंग शॉप अॅप वर आपला कॉन्टॅक्ट डिटेल रजिस्टर करावा लागेल. या ऑफर अंतर्गत मिळणाऱ्या व्हाऊचर कॅटेगरी वेगळी आहे. यात स्मार्टफोन, टीव्ही, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, मायक्रोवेव, टेबलेट, स्मार्टवॉच, वायरलेस ऑड़ियो यासारख्या प्रोडक्टचा समावेश आहे. हे व्हाऊचर 365 दिवसांसाठी वैध आहे. तसेच, जे ग्राहक आधीपासून सॅमसंगच्या डिव्हाईसचा वापर करीत आहेत. त्याच ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.