मुंबई – छोटया पडद्यावरील अभिनेत्री श्वेता तिवारी ही आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफमुळे सतत प्रसिद्धीच्या झोतात असते. तसेच श्वेता सोशल मीडियावरही खूपच ऍक्टिव्ह असते. ती स्वतःचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो चाहत्यांशी शेअर करत असती. श्वेताचे आणखी काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
View this post on Instagram
या फोटोंमधील श्वेता तिवारीचा ग्लॅमरस अंदाज पाहण्यासारखा आहे. या फोटोत ती डीप नेक ड्रेसमध्ये बोल्ड अंदाजात पोज देताना दिसत आहे. यात तिने ग्रीन कलरचा डीप नेक गाउन घातलेला आहे. तसेच मोकळे सोडलेल्या केसांमध्ये श्वेता खूपच सुंदर दिसत आहे.
View this post on Instagram
हे फोटो शेअर करत श्वेताने कॅप्शनमध्ये लिहिले की, मी निर्भयपणे जन्मलेली आहे. या फोटोंवर असंख्य चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. तसेच काही कलाकारांनीही तिच्या फोटोंवर कमेंट करत तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, एकता कपूरच्या “कसोटी जिंदगी की’ या मालिकेतून श्वेता तिवारी घराघरात पोहोचली होती. श्वेता अखेरच्या वेळी सोनी टीव्हीवरील “मेरे डॅड की दुल्हन’मध्ये झळकली होती. या मालिकेतील श्वेताची भूमिकाही चाहत्यांना खूपच आवडली होती.
View this post on Instagram