कुरवली -इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील तावशी, उद्घट, जांब, कुरवली, चिखली, मानकरवाडी, पवारवाडी या गावातील नागरिकांनी बंद पाळत करोना रोगावर मात करण्यासाठी सहभाग नोंदवला.
या भागातील कुरवलीच्या सरपंच शोभा पांढरे, चिखली सरपंच सुवर्णा भंडलकर, उद्घटचे सरपंच रवींद्र यादव, पवारवाडी सरपंच प्रशांत करे, तावशी सरपंच सीमा सपकळ, पोलीस पाटील विलास कणसे, राजू गायकवाड यांनी आपल्या गावातील नागरिकांना वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदचे आवाहन करत जनजागृती केली.